बेळगुंदी येथील एका शेतकऱ्याचा स्पर्शदंशाने मृत्यू झाला. मिनाजी बगीलगेकर हा शेतकरी गुरुवारी दुपारी काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेला होता . यावेळी काजू झाडाखाली साचलेला पालापाचोळा दूर सारताना पाचोळ्यात बसलेल्या विषारी सापाने त्याचा पायाला दंश केला काही क्षण त्यांना समजलेच नाही, यानंतर ते खाली कोसळले .
यावेळी नजीकच्या बागेत काम करण्यारणी त्यांना उपचाऱ्यासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल केले , तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आला. मात्र उपचाराचा उपयोग झाला नाही.
शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. मृत मिनाजी हे बेलगुंदी येथील कळमेश्वर गली येथे राहत होते .त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी ,एक मुलगा असा परिवार आहे
बातमी सौजन्य-महादेव पवार झी 24 तास