बस चालकाच्या मृत्यूस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत बस चालक आणि वाहकांनी सोमवारी सकाळ पासून शहर बस सेवा बंद केली आहे.सर्व बसेस स्थानकावर आहेत तिथेच थांबून आहेत.
संती बस्तवाड बस चालकाचा रविवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता यास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलन करत बस सेवा बंद केली आहे.
बेळगाव शहापूर येथील निवासी एम एस कागजी हे संती बस्तवाड बस चे ड्रायव्हर यांनी अधिकाऱ्याकडे रविवारी रात्री ड्यूटी करतेवेळी आपणास छातीत वेदना होत आहेत सुट्टी ध्या अशी विनंती केली तरी अधिकाऱ्यांनी त्यांना ड्यूटी वर पाठवले होते काल रात्री संती बस्तवाड मध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आला असता स्वतः बस वाहक पुनूजगौडा यांनी बस चालवत बेळगाव हॉस्पिटल पर्यंत आणली होती तरी देखील त्यांचा जीव वाचू शकला नव्हता या जबाबदार धरत शहर सी बी टी बस बंद करत बस चालक वाहकांनी आंदोलन सुरू केलं आहे
Trending Now