Saturday, November 23, 2024

/

आता ट्रॅफिक वर असणार एच डी कॅमेऱ्यांची नजर

 belgaum


traffic cantrol room south ps

बेळगाव शहर ट्राफिक दिवसेंदिवस हायटेक होताना दिसत आहेत ट्राफिक नियंत्रणासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 23 टॉवर उभे करून अनेक चौकात 90 कॅमेरे बसवून ट्राफिक मॅनेजमेंट केलं गेल आहे. या सर्व कॅमेऱ्यावरील दृश्ये एकाच रूम मध्ये बघून शहरातील ट्राफिक मॅनेजमेंट केलं जाणार आहे. नियंत्रण कक्ष तयार झाला असून बेळगाव पोलीस हायटेक तंत्रज्ञान वापर करणार आहेत.

शहरात ट्राफिक  नियंत्रणासाठी सगळे हाय डेफिनेशन चे कॅमेरे बसविण्यात आले असून कारच्या आत कोण बसल आहे याचे फोटो सुद्धा या कॅमेऱ्यातून येतात एवढी पिक्चर क्लीयारीटी या कॅमेऱ्यात बसविली आहे त्यामुळे सुरक्षा आणि गुन्ह्याचा तपासात देखील हे कॅमेरे उपयोगी पडणार आहेत .

कॅम्प ट्राफिक दक्षिण पोलीस स्थानकात हा नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून 23 टॉवर आणि 90 कॅमेऱ्याची दृश्ये एकाच रूम मध्ये पाहून ट्राफिक नियंत्रण केलं जाणार आहे . ही नवीन ट्राफिक मॅनेजमेंट व्यवस्था अमलात आल्यावर ट्राफिक नियम तोडणारे पोलिसांच्या तावडीतून सुटणे मुश्किल आहे. सुरुवातीला ९० असलेल्या कॅमेऱ्यांची संख्या भविष्यात ५०० असणार आहे अशी देखील माहिती उपलब्ध झाली  आहे .पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी आणि ट्रफिक ए सी पी शंकर मारिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियंत्रण कक्षाच काम सुरु आहे ते लवकरच फुल फ्लेज होणार आहे .
सिग्नल जम्प करणे,हेल्मेट न वापरणे, नो पार्किंग, वन वे विरुद्ध गाडी चालवणे अश्या वाहनाचे नंबर कॅमेऱ्यात पाहून कारवाई करता येणार आहे.ट्राफिक व्यवस्थेवर नजर ठेवता ठेवता क्रिमिनल ऍक्टिव्हिटी वर देखील नजर ठेवता येणार आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.