अपघात झाला की पोलीस नाहक त्रास करतील म्हणून जखमीला उपचाराची मदत मदत करायला विसरू नका याची जनजागृती करताहेत कायद्याचा अभ्यास करणारे विध्यार्थी…..,
आर एल लॉ कॉलेजच्या विध्यार्थी हाच विषय घेऊन बेळगावातील अनेक रस्त्यावर आणि चौकात चौकात पथ नाट्या द्वारे जागृती करताना दिसत आहेत.आता पर्यत शहरातील 23 ठिकाणी हे नाट्य सादर केलं असून शनिवारी श्रीनगर गार्डन,स्कायझोन,जे एन एम सी आणि हनुमान नगर येथे सादर केला तर उद्या रविवारी तिसरा रेल्वे गेट डी मार्ट जवळ आणि पिरनवाडी सायंकाळी 5 वाजता सादर करणार आहेत. पथनाट्यास बघ्या कडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पोलिसांकडून रस्ते अपघातात जखमींना मदत केल्याने राज्य शासनानकडून पुरस्कार मिळू शकतो पोलीस मानसिक त्रास करत नाहीत त्यामुळं जखमीला मदत करा असा संदेश पथ नाट्या द्वारे दिला आहे. मुख्यमंत्री सांत्वन हरीश योजने अंतर्गत रस्ते अपघातातील जखमीला त्वरित उपचार करणे गरजेचे असून जखमीच्या पहिल्या 48 तासाला गोल्डन तास संबोधलं जातंय आणि पहील्या 25 हजार रुपया पर्यंत उपचारासाठी राज्य सरकार मदत करतंय.
नीता कुलकर्णी पथनाट्य लिखाण आणि दिग्दर्शन तर सह निर्देशक अभिजित देशपांडे आहेत पटकथा सचिन भट यांनी तर प्रोफेसर ज्योती कुलकर्णी या संयोजिका आहेत