श्री माता को ऑप क्रेडिट सोसायटीने भागधारक,ठेवीदार,ग्राहक आणि हितचिंतक यांच्या विश्वास आणि सहकार्यावरच यशस्वी रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे.यंदा संस्थेला विक्रमी सात कोटीहून अधिक नफा झाला आहे असे उदगार श्री माताचे संस्थापक चेअरमन मनोहर देसाई यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना काढले.
सध्या एकोणीस कोटीहून अधिक भाग भांडवल आहे.237 कोटी रु च्या ठेवी आहेत.212कोटीहून अधिक कर्ज देण्यात आले आहे. खेळते भांडवल 307 कोटीहून अधिक आहे. भागधारकांना दहा टक्के लाभांश देण्यात येणार आहे.
सर्वसाधारण सभेत सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सभेला भागधारक ,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पाणी अडवा पाणी जिरवा संदेश देण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. पाच आदर्श खेडयांची निवड करून त्यांना पुरस्कार देण्याची योजना श्री माताने आखली आहे .
Trending Now