नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या मराठी लोकप्रतिनिधींच पद रद्द करणारा कायदा करणार असल्याच वक्तव्य केल्या नंतर संपूर्ण सीमा भागात बेग यांच्या विरोधात वातावरण ढवळून निघाल आहे. उद्या गुरुवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी परी पत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चात शिव सेनचे दोन मंत्री सहभागी होणार असल्याची माहिती बेळगाव live ला मिळाली आहे .
शिव सेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्य मंत्री कर्नाटक संपर्क प्रमुख दीपक सावंत हे दोन मंत्री मोर्चात सहभागी होऊन जय महाराष्ट्र च्या घोषणा देणार आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजता संभाजी चौकातून या मोर्चा सुरु होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे . शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाननंतर रावते आणि सावंत हे दोघे जन मोर्चात सहभगी होऊन बेळगावात जय महराष्ट्र चा यल्गार करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे . गुरुवारी सकाळी बेळगाव शिव सेना कार्यालयास भेट देतील आणि मग मोर्चात सहभागी होतील अशी देखील माहिती मिळाली आहे . शिव सेनेचे दोन्ही मंत्री मोर्चात सहभागी होणार असल्याने मोर्चाच महत्व वाढल आहे .