Tuesday, December 24, 2024

/

भाजप आमदाराने टाकली व्हाट्स अप्प वर अश्लील पोस्ट

 belgaum

बेळगावमधील विधान परिषदेच्या भाजप आमदाराने एका व्हाट्स अप्प ग्रुप वर अश्लील पोस्ट टाकल्याने सोशल मीडिया वर याची जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,जिल्ह्यातील शासकीय अधिकारी , सर्व पक्षीय राजकारणी अनेक महिला असलेल्या ‘बेळगाव मीडिया फोर्स नावाच्या ‘व्हाट्स अप्प ग्रुप वर भाजपच्याSExy post by mlc विधान परिषद सदस्य  महंतेश कवटगीमठ यांच्या फोन वरून अश्लील मेसेज शेयर केल्याने खळबळ उडाली आहे.

व्हाट्स अप्प फेस बुक किंवा सोशल मीडियावर कोणता मेसेज कुठं आणि कुणाला पाठवावा याचं भान लोक प्रतिनिधीना नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.कर्नाटकातील भाजप चे माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना विधान भवन सभागृहात अश्लील क्लिप पाहिल्याने मंत्री पद गमवावा लागल होत.भाजप तात्कालीन अध्यक्ष  अनिल बेनके यांचं अश्लील  फोटो वायरल झाल्याने त्यांना  भाजप अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं आता कवठगीमठ यांच्यावर भाजप कारवाई करेल का? हे पहावं लागेल.

बेळगावातील या भाजप आमदारांन अश्लील पोस्ट टाकल्यावर त्यांना लगेच अडमीन नि ग्रुप मधून बाहेरचा रस्ता दाखविला तरी देखील या ग्रुप वर त्याची जोरदार चर्चा सुरू होती आमदाराच्या पर्सनल फोन वरून ही पोस्ट पडल्याने वास्तविक आमदार कडून दिलगिरी येणे आवश्यक होते मात्र अद्याप आमदारांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.