निवेदन देतेवेळी मोबाईल वर गुंग असलेल्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या काढत त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव वकील नागेश सातेरी यांनी करून दिली आहे. शुक्रवारी मध्यवर्ती समितीच्या वतीने मराठी परि पत्रकासाठी निवेदन दवतेवेळी हा प्रकार घडली आहे.
समिती च्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी निवासी जिल्हाधिकारी बसवराज इटनाळ यांनी समिती नेत्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. समितीचे नेते निवेदन वाचत असतेवेळी इटनाळ हे मोबाईल वर व्यस्त होते मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यात त्यांच गांभीर्य नव्हतं लोकशाही मार्गातून मराठी नेते करत असलेली मागणी कडे ते दुर्लक्ष करत होते यावेळी वकील नागेश सातेरी यांनी इटनाळ यांना चांगलेच धारेवर धरले दोघांत शाब्दिक चकमक उडाली मात्र आपल्या कर्तव्याच भान हरपलेल्या अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या सातेरी यांनी केल्या यांच्या सोबत आलेले जेष्ठ वकील कामगार नेते राम आपटे यांनी देखील त्या अधिकाऱ्यास आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली त्यावेळी सदर अधिकाऱ्याने निरुत्तर होत निवेदनाचा स्वीकार केला.
कित्येक वेळा अधिकारी समिती नेत्यांच्या मागणी कडे दुर्लक्षच करत असतात मात्र समिती नेते मागणी पेक्षा जास्त फोटो प्रिय असल्याने याकडे दुर्लक्ष होते शुक्रवारी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी नागेश सातेरी आणि राम आपटे जिल्हाधिकरो कार्यालयात गेले होते त्यावेळी समिती नेते देखील निवेदन द्यायला गेले असता दोघे वकील समितीच्या शिष्टमंडळात सामील झाले होते.दोन वकील शिष्टमंडळात असल्याने अधिकाऱ्यास झापले अन्यथा समिती नेते मान हलवत परतले असते