रशीद मलबारी याच्या साथीदारांनी रोहन रेडेकर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्या नंतर चोरला घाटात गोवा सीमेवर 100 फूट खोल दरीत सापडलेले रोहन च्या शरीराची कवटी आणि सांगडा डी एन ए टेस्ट साठी पाठविला जाणार आहे.
डी एन ए ला पाठविण्याची न्यायालयीन प्रक्रिया बेळगाव पोलिसांनी सुरू केलेली आहे चोरला जंगलात रोहन ने दोन वर्षांपूर्वी घातलेल्या जीन्स पॅन्ट चा तुकडा आणि कॉलेज ची ओळख पत्र देखील पोलिसांना जंगलात सापडली आहेत डी एन ए रिपोर्ट आणि या सगळ्या गोष्टी न्यायालयात खूप उपयोगी पडणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव पोलिसांनी कर्नाटक गोवा सीमेवर स्थानिक लोकांच्या मदतीनं मृतक रोहन रेडेकर च्या मृतदेहाचे अवयव शोधण्याची मोहीम राबवली होती या शोध कार्यातील काही एक्सकलुझिव फोटो बेळगाव live च्या हाती लागले आहेत बेळगाव पोलिसांचा किती मोठा ताफा या शोध कार्यात लागला होता हे या फोटो वरून स्पष्ट झालं आहे