स्केटिंगमध्ये विश्वविक्रम नोंदवलेला स्केटिंगपटू रोहन अजित कोकणे याने स्केटिंग करत पस्तीस फूट उंचीची स्टिक हनुवटीवर बॅलन्स करण्याचा नवा विक्रम नोंदवला.
लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग ग्राऊंडवर स्केटींग करत हनुवटीवर स्टिक बॅलन्स करण्याचा नवा विक्रम रोहनने विक्रम केला.प्रथम तीस फुटाची 3.80 किलो वजनाची स्टिक हनुवटीवर 2.19 सेकंद इतका वेळ ठेवून विक्रम नोंदवला.नंतर पस्तीस फूट लांब आणि4.30 किलो वजनाची स्टिक हनुवटीवर 36 सेकंद ठेवून नवा विक्रम केला.प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन रोहनला लाभले.बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व जायंट्स ग्रुप
ऑफ बेलगाम मेन च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.