ऑटो नगर भागात फळ भाजी पाला कोल्ड स्टोरेजच्या नावाने अनुमतीने मिळवून तीन बेकायदेशीर जनावरांच मांस स्टोरेज करत आहेत हे तीन बेकायदेशीर कत्तल खाने जनावरांचा मांस विक्री साठी चालवले जात आहेत जिल्हा प्रशासनाने मांस कत्तल खाने बंद करावे अशी मागणी श्री राम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे. पोलीस, रेव्हेन्यू, आर टी ओ प्रदूषण नियंत्रण बोर्ड सर्व कार्यालयांना हे बेकायदेशीर कत्तल खाने चालविण्यासाठी महिना हप्ता दिला जातो याच स्पष्टीकरण ध्याव अशी मागणी देखील मुतालिक यांनी केली आहे त्वरित हे कत्तल खाने बंद न केल्यास राम सेना बेळगाव बंद आदेश देईल असा इशारा दिला आहे.
मोदी यांनी पदभार स्वीकारल्या नंतर देशात गो रक्षाची चर्चा सुरू आहे काँग्रेस सह सेक्युलर पक्षांनी गो रक्षकांवर नव्हे ते आरोप केले आहेत कृषी प्रधान देशात गायीचं रक्षण होताना दिसत नाही आहे.देशात सध्या 40 हजार कत्तल खाने कार्यरत असून कसाब किंवा मुस्लिम गोहत्त्या करण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकार अधिक गो हत्त्या करत आहेत असा आरोप मुतालिक यांनी यावेळी केला