आठवड्याचा माणूस
सतीश तेंडुलकर
सतीश आणि सचिन ही दोन नावे विचारात घ्या. तिष आणि चीन यामधला फरक बाजूला काढा आणि तेंडुलकर या आडनावाटले साम्य शोधा. एक क्रिकेटचा देव, दुसरा देव नाही पण देवदूत म्हणता येईल इतका गोरगरिबांसाठी कार्यरत, सतीश तेंडुलकर. म्हणूनच आम्ही त्यांची निवड केली बेळगाव live च्या आठवड्याचा माणूस या साठी.
सतीश रमाकांत तेंडुलकर हे त्यांचे पूर्ण नाव. वय अवघे ३९. रामदेव गल्लीतल्या शाळा क्र २९ चे ते विद्यार्थी, मराठी माध्यमात शिकून सुद्धा इंग्रजीवर चांगली पकड असलेला समाज सेवक, आज त्यांचा मोठा दरारा आहे, तसा हा माणूस टेक्सटाईल हाउस या पिढीजात व्यवसायातील एक संचालक, मात्र व्यवसाय सांभाळत महत्वाच्या विषयांवर आवाज उठविण्यात आघाडीवर, म्हणूनच ते आज सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहेत.
अगदी लहान वयात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स चे सदस्य होण्याची संधी त्यांना मिळाली, पुढे ते या संस्थेचे अध्यक्ष झाले, पोस्ट रेल्वे आणि इतर अनेक संस्थांचे सल्लागार सदस्यही बनले, फक्त नाममात्र सदस्य न बनत त्यांनी सक्रिय कार्यकर्त्याची भूमिका निभावली आणि लोकांचे प्रश्न मांडून लोकनेते बनले.
सतीश बीकॉम पदवीधर आहेत, ते सिए नाहीत पण अभ्यास केला आहे, तरुण वयात चेंबरचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी भरीव काम केलेच मात्र माजी अध्यक्ष फोरम काढून ते राबताहेत.
गोवा सरकारचा बेळगाव वाहनांसाठी जाचक कर (टोल)त्यांनी रद्द करवून घेतला यात तेंडुलकर यांचा सिंहाचा वाटा होता बेळगावात पासपोर्टचे ऑफिस व्हावे म्हणून त्यांची धडपड आहे, पोस्ट ईएस आय सारख्या सेवा मिळण्यासाठी ते परिश्रम करतात.
स्वार्थ नसलेला एकमेव कार्यकर्ता ही त्यांची ओळख, त्यांच्या कार्याला बेळगाव live च्या शुभेच्छा
संपर्क सतीश तेंडुलकर
+919845230995