आठवड्याचं व्यक्तिमत्व
नागरत्ना रामगौडा
खरेतर एड्स किंवा एच आय व्ही ची बाधा झाली की लोक तोंड लपवून जगतात, आणि या रोगाच्या चक्रात अडकून तशीच मरूनही जातात, मात्र काही व्यक्ती अशाही असतात, आलेली परिस्थिती स्वीकारून जगताना त्या याचप्रकारच्या परिस्थितीत अडकलेल्या इतरांसाठीही जगतात, त्यांना जगवतात आणि आपली वेगळी ओळख तयार करतात, त्यापैकीच एक नागरत्ना रामगौडा.म्हणूनच बेळगाव live साठी त्या आठवड्याचं व्यक्तिमत्व ठरल्या आहेत.
नागरत्ना या नावाप्रमाणेच एक रत्न आहेत. माहीत नसताना पती पासून त्यांना एड्स झाला, नंतर पतीही दगावला तरीही त्या घाबरल्या नाहीत, स्वतःचे जीवन एड्स बाधितांसाठी देऊन त्यांचे काम सुरू आहे, सध्या स्वतःच स्थापन केलेल्या आश्रय फौंडेशन च्या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार मुलींना आश्रय दिला आहे.
त्या कोनवाळ गल्लीत राहतात. बीए पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. जिल्हा हॉस्पिटल मध्ये पीआरओ, मास, मिरडा प्रकल्पात सुपर वायजर, बर्डस च्या प्रकल्पात कोन्सिलर, महेश फौंडेशन मध्ये कार्यकर्त्या या सारख्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
याच आठवड्यात एका मुलीला फसवून एक एड्स बाधिताशी लग्न लावणाऱ्यांपासून त्यांनी वाचविले आहे. काहीच चूक नसताना जेंव्हा याप्रकारच्या रोगाची शिकार व्हावे लागते तेंव्हा माणूस खचून जातो. याचवेळी आधाराची खरी गरज असते, तो देत त्यांची वाटचाल सुरू आहे.
त्यांच्या या कामाची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. अनेक मानाच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी झाल्या आहेत. स्वतः निखाऱ्यांवरून चालत असताना आणि मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना इतरांना मदतीचा हात देणाऱ्या या कार्यकर्तीला बेळगाव live चा मानाचा मुजरा.
संपर्क -नागरत्ना
आश्रय फाऊंडेशन
मोबाईल-09964165566
Congratulations Nagratna