पाणी पट्टी भरण्यासाठी बेळगाव कर जनतेला आता रांगेत उभा राहण्याची गरज भासणार नाही आहे याचं कारण अस आहे पाणी पट्टी भरण्याची सुविधा आता ऑनलाईन देखील करण्यात आली आहे त्यामुळं बेळगाव वन केंद्र किंवा थेट पालिकेत जाण्याऐवजी आता बेळगावातील जनता हे पाणी बिल ऑनलाईन भरू शकणार आहे.
नव्या सुविधेमुळे आता घरबसल्याच पाणी पट्टी भरता येणार आहे. आज पासूनच या ऑनलाईन सुविधेचा प्रारंभ होणार आहे. सोमवारी पाणी पुरवठा अभियंता प्रसन्नमूर्ती यांनी महापौर कक्षात महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर यांची भेट घेतली आणि नवीन योजनेची माहिती दिली.
पाणी बिल भरण्यासह नवीन नळ जोडणी अर्ज देखील ऑनलाईन उपलब्ध होणार असून ही ऑनलाईन सुविधा कर्नाटक राज्यात बेळगावात सर्व प्रथम लागू करण्यात आली आहे. या सर्वऑनलाईन सुविधा पाणी पुरवठा मंडळाच्या www. belgaviwaterboard. org या संकेत स्थळावर उपलब्ध असणार आहे
न्यूज सोर्स-सकाळ बेळगाव