मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेल्या १०० कोटीच्या निधीचा दुरुपयोग आमदार फिरोज शेठ यांच्या दबावातून झाल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
बेळगाव मनपाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाचा दुरुपयोग झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप महानगरने केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे जिल्हाधिकारी एन. जयराम यांना निवेदन देऊन हा आरोप करण्यात आलाय, .
ज्या उद्देशासाठी अनुदान दिले आहे. त्याला छेद गेला आहे. अधिकारी आमदार फिरोझ सेठ यांच्या दबावाला घाबरून निधीचा दुरुपयोग करत आहेत. तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी अनधिकृत वसाहतीसाठी वापरण्यात आला, त्यापैकी ५ कोटी रुपयांचा निधी हा फिरोझ सेठ यांच्या मुलाच्या अमन नगर ते बसवाण कुडची रस्त्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. अनधिकृत वसाहतीला अनुदान दिल्यामुळे महापालिकेच्या महसुलात कपात होत आहे. निधीचा दुरुपयोग झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि एससी-एसटी वसाहतीला १० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपचे महानगर उपाध्यक्ष राजू टोपन्नावर आणि भाजप कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले.