दिवसा ढवळ्या घरात घुसून अज्ञातानी डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसर पत्नी चा खून केल्याची घटना बुधवारी दुपारी द्वारका नगर टिळकवाडी येथे घडली आहे.भार्गवी मोरपपनावर वय 58 वर्ष अस त्या दुर्दैवी डी एफ ओ पत्नीचं नाव आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी श्वान पथक फिंगर प्रिंट एक्सपर्ट सह जाऊन तपास करून पंचनामा केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भार्गवी या घरी एकट्या असतेवेळी अज्ञातानी घरी प्रवेश करून टॉवेल ने गळा दाबून हा खून केला असल्याची माहिती मिळाली आहे. भार्गवी यांचे हात पाय बांधुन तोंडात कपडा कोंबून खून करण्यात आला आहे.त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील दागिने अज्ञातानी लंपास केले आहेत भर दुपारी कुणी घरात नसलेलन पाहुन हे कृत्य केलं असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भार्गवी या बेळगावचे सोशल फॉरेस्ट्री डी एफ ओ आनंद मोरपनावर यांची पत्नी असून डी एफ ओ आणि भार्गवी दोघे जण दवाखान्याला जाऊन आले होते आनंद हे भार्गवी ना दुपारीच घरी सोडून ऑफिस ला गेले होते. घरातील कपाटातून किती रक्कम चोरली ? हा खून आहे का आणखी काही, खुन करण्याचा उद्देश्य दरोडा हाच आहे का? याचा तपास देखील पोलीस करताहेत.दिवसा ढवळ्या घरी घुसून महिलेचा खून झाल्याने या भागात खळबळ माजली आहे पोलिसांकडून कानून आणि सुव्यवस्था बिघडली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे