बेळगावातील मराठा सेंटर मध्यें सहा महिने हुन अधिक काळ खडतर परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग जवानांना सीमेवर देश संरक्षण करताना होईल असे उदगार मराठा सेंटर चे ब्रेगेडिअर प्रवीण शिंदे यांनी काढले .
शिस्त आणि फिटनेस च महत्व सांगत सेनेत देश सेवेला सज्ज राहावं अस आवहन करत भविष्यातील असाईनमेंट ला शुभेच्छा दिल्या.
बेळगावातील मराठा सेंटर च्या 296 प्रशिक्षित जवानाच्या शपथ विधी सोहळ्यात बोलत होते. यावेळी प्रशिक्षित जवानांनी देश सेवेची शपथ घेतली
मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर च्या तळेकर ड्रिल मैदानावर जवानांचा शपथविधी झाला, 296 जवान देशसेवेत रुजू झाले.देशाच्या अनेक भागात त्यांचे पोस्टिंग होणार आहे.
यावेळी शानदार पथ संचलन झाले त्याचे जवान अक्षय कडवे याने नेतृत्व केले होते. कॅप्टन रॉबिन अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली शपथ घेण्यात आली.
जवान अविनाश पाटील, अक्षय कडवे, अक्षय जाधव,महानतेश दारुडूनदी ,स्वप्नील शिंदे या जवानाना विविध प्रकारात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला, लष्करी अधिकारी आणि जवानांचे पालक उपस्थित होते.