तुम्ही प्रथम भारतीय आहात हे लक्ष्यात ठेवा
किरण ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले.केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जिल्हा प्रशासनाला भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मराठी भाषिकांचे हक्क पूरवा अशी सूचना दिली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम यांनी या पार्श्वभूमीवर समिती नेत्यांची बैठक घेतली आणि पुन्हा एकदा मराठी परी पत्रक देण्याचे आश्वासन देत २५ रोजी होणाऱ्या मोर्चाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाषिक अल्पसंख्यांक कायद्या नुसार सीमा भागातील मराठी जनतेला मराठीत परीपत्रके द्या या मागणीसाठी उपस्थित सीमा भागाचे नेते किरण ठाकूर यांनी जयराम यांना चांगलेच धारेवर धरल गेली चार वर्ष उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील परी पत्रकासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र एकीकडे कर्नाटकला पाणी देते कर्नाटक भाषिक अल्पसंख्याक अधिकार देण्यास का टाळाटाळ करत आहे असा सवाल त्यांनी यावेळी केला.त्यावर जिल्हाधिकारी मी पहिला कर्नाटक सरकारचा सेवक आहे असे म्हणाले. त्यावर किरण ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्याना आपण पहिला भारतीय आहात याची कल्पना करून दिली .
वकील नागेश सातेरी यांनी कर्नाटक सरकारच्या २००४ च्या आदेशानुसार अल्पसंख्याक असणाऱ्याना मराठीत पत्रक देण्याच्या कायदा मागे घेतला नाही तर सर्क्युलर काढलं आहे. अल्पसंख्यांना अधिकार देणे हा कायदा रद्द केला नाही, सर्क्युलर म्हणजे कायदा नव्हे .
१९९५ आणि २०१३ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयातील आदेश नुसार अल्पसंख्यांना मराठीत परी पत्रक दिली पाहिजेत मात्र अध्याप आपण दुर्लक्ष करत आहात असे निदर्शनास आणून दिले, यावेळी आपण लवकरच दुसर्या गटाशी चर्चा करून देव नागरीत हॉस्पिटल आणि हेस्कोम मध्ये मराठीत कागदपत्रे देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी टी के पाटील सरिता पाटील रेणू किल्लेकर भाऊ गडकरी यांनी देखील बैठकीत सूचना मांडल्या. बैठकीवेळी अरुण चव्हाण पाटील यांनी गेली चार वर्ष आपण बेळगावात जिल्हाधिकारी पदावर आहात अल्पसंख्यांकांसाठी काहीच का करू शकला नाही असा सवाल करताच तुम्हाला असे बोलण्याचा अधिकारी नाही असे जयराम म्हणाले. त्यावेळी पाटील यांनी जयराम यांना आपण मराठी भाषिकांना अधिकार देण्यात अपयशी ठरला असा आरोप केला .
किरण ठाकूर यांनी मुद्देसूद बाजू मांडून निरुत्तर केले, यावेळी जिल्हाधिकारी वारंवार एकाच बाजूने बडबडत होते.