मेडिकल विध्यार्थ्यांना ब्लकमेल करणाऱ्या पाच नकली क्राईम रिपोर्टरना ए पी एम सी पोलिसांनी अटक केली आहे. कुमारस्वामी ले आऊट मधील एका घरात अभ्यास करणाऱ्या फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करून आम्ही मीडिया चे लोक आहे असं म्हणत 30 हजार रुपयांची मागणी त्या ब्लकमेलर नी मेडिकल स्टुडंट कडे केली होती
फार्मसी कॉलेज चे काही विध्यार्थी आणि विध्यार्थीनी एकाच घरातील खोल्यात राहतात अश्या वेळी ब्लॅकमेलर नी अचानक कुमार स्वामी ले आऊट मधील घरात प्रवेश करून विध्यार्थ्यांना मुलं मुली एकाच घरात का राहता असा प्रश्न करत पैश्याची मागणी केली.आणि विध्यार्थ्यावर हल्ला केला होता. पोलिसांनी अस्लम मुल्ला (40) गांधी नगर, मुख्तार बसापूर(35) नवीन वंट मुरी कॉलनी, मोहम्मद झाकीर मुल्ला(35)कोतवाल गल्ली, सादिक ढोणी(42)गुल बशा गल्ली, युनूस ऐनापूर या पाच जणांना अटक केली आहे. ए पी एम सी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे