मुलांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचं याचा निर्णय पालकांचा असतोय मात्र आई वडील नसले तरी आपल्या नातीला मराठी माध्यमातूनच शिकवून प्रचंड यश मिळवण्यात सिंहाचा वाटा उचललेल्या आजी सुशीला पाटील आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर शिक्षणात भाषेचं माध्यम महत्वाचं नसून डीडिकेशन महत्वाचं आहे हे दाखवुन देत पी यु सी परीक्षेत 97.48 % गुण मिळवुन यश संपादन केलेल्या शीला केरळकर हिचा सत्कार मराठी साठी काम करणाऱ्या युवकांनी केलाय.
मराठी शाळां एकच पर्याय याची खेडोपाड्यात जाऊन आपल्या पाल्याना मराठी शाळेतच पाठवा अशी मोहीम राबविणाऱ्या युवकांनी आजी सुशीला पाटील आणि शहरातील एक दर्जेदार अश्या जी आय टी मध्ये फ्री सीट मिळवलेल्या शीला केरळकर हिचा सत्कार करून समाजा समोर आदर्श ठेवला आहे.कित्तूर चनम्मा चौकातील गणेश मंदिरात पेढे वाटून हा सत्कार करण्यात आला यावेळी सुनील चोपडे ,मंदिर चे पुजारी
गीता मालगावी विजय निंबाळकर महेश जाधव,दैविक हळदणकर,अक्षय कामत, मेघन लंगरकांडे भावेश तनावडे रोहन लंगरकांडे प्रविण कोराने उपस्थित होते.मराठी एकच पर्याय आंदोलनातील युवक विजय निंबाळकर याने बेळगाव live शी बोलताना सांगितलं की मराठी माध्यम शाळेत शिकून बारावीत प्रथम क्रमांक एवढं यश मिळवल्याने उघडा डोळे, बघा नीट अस म्हणण्याची वेळ आली आहे शीला च्या यशाने आमच्या मराठी शाळा वाचवा या अभियान ला नवीन ऊर्जा निर्माण करून दिली आहे त्यामुळं आता काय बोलणार. यश तुमच्या समोर आहे.
इंग्लिश, इंग्लिश, इंग्लिश म्हणाऱ्यांना चपराक आहे तेंव्हा
मराठी शाळा एकच पर्याय आहे.
Nice & good news coverage