गेली तीन दशक मी भाजपात सक्रियरित्या काम करून पक्ष वाढविला आहे म्हणून पक्षांन अरभावी मतदार संघ माझ्यासाठी सोडावा अशी मागणी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष इराणा कडाडी यांनी केली आहे.
ग्रामीण भागात गेल्या 30वर्षा पासून भाजप पक्ष मी बांधला आहे 1994 मध्ये अरभावी मतदार संघात भाजप चा उमेदवार होतो तेंव्हा पासून पक्ष बांधला आहे पक्षात नवीन आलेल्यांना मी जागा सोडून त्याग केला होता असंही ते म्हणाले.
ऑपरेशन कमल अंतर्गत भालचंद्र जारकीहोळी भाजपात आलेले होते 150 मिशन जर भाजप ला पार करायचे असेल तर निष्ठावन्त कार्यकर्त्यांना तिकीट ध्यावी अशी मागणी देखील त्यांनी केलीये.
भालचंद्र जारकीहोळी जिल्ह्यात कुठंही बसले तर निवडून येऊ शकतात बेळगाव उत्तर गोकाक किंवा यमकनमर्डी मधून त्यांनी निवडणूक लढवावी आणि अरभावी मला सोडून द्यावी अशी मागणी त्यानी केली आहे