Thursday, December 26, 2024

/

आय पी एल क्रिकेट खानापुरात लाईव्ह स्क्रीनींग

 belgaum

आगामी ANjalitai nimbalkarदिनांक १६, १७, १९ व २१ मे २०१७ रोजी खानापूर येथील मलप्रभा मैदान, जांबोटी क्राॅस येथे डाॅ अंजलीताई फाऊंडेशन, खानापूर यांचे सहयोगाने आय पी एल २०१७ च्या क्वालीफायर, इलिमीनेटर व फायनल मॅचेस चे थेट प्रक्षेपण दाखविण्याची सोय करण्यात आली आहे.

हे थेट प्रक्षेपण अडतीस फूट बाय वीस फूट भव्य हाय डीफीनीशन (HD) डिजीटल स्क्रीनवर करण्यात येणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मलप्रभा मैदानामध्ये स्टेडीयमची मजा लुटण्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमाविषयी विचारले असतां डाॅ अंजलीताई फौंडेशन च्या अध्यक्षा डाॅ अंजली निंबाळकर यांनी ‘खानापूर तालुक्यांतील क्रिकेट प्रेमी जनतेला ही एक आगळी वेगळी संधी असून आपल्याच गावच्या मैदानावर मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्याचा, जणू अगदी मैदानातच मॅच पहायचा आनंद मिळावा’ ही अपेक्षा व्यक्त केली. ‘खानापूर तालुक्यांतील क्रीडाप्रेमी जनतेला व युवा पिढीला एक मनोरंजन आणि विरंगुळा म्हणून हा उपक्रम सार्थ होईल’ असेही त्या बोलताना म्हणाल्या.

खानापूर व बेळगांव जिल्ह्यातील हा अशाप्रकारचा मैदानात थेट प्रक्षेपण पहायचा पहिलाच उपक्रम असल्याने जनसामान्यांत व क्रीडा प्रेमींमध्ये विशेष कुतुहल आणि कौतुक व्यक्त होत आहे. या ऊपक्रमासाठी प्रवेश मोफत असून जनसामान्यांनी व क्रिकेट प्रेमींनी ह्या उपक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती डाॅ अंजलीताई फौंडेशन, खानापूर तर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.