प्रकाश सिनेमा च्या शेजारील असलेल्या नाल्यात अतिक्रमण करून कंपाउंड बांधल जात आहे. नाला 20 ते 30 फुटाचा असतो त्याच्या बाजूला बफर्स झोन असतो सेट बॅक सोडावा लागतो मात्र सर्व नियमांचा उल्लंघन करून नाल्यात अतिक्रमण सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा उद्योग सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे.
कोणत्याही गरीब किंवा मध्यम वर्गीयांनी अस अतिक्रमण केलं असत तर हे पालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यानी त्वरित कारवाई केली असती मात्र इकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालं आहे. या अतिक्रमणाची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे
पालिका झोपली आहे का? महा पालिकेने याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.