बेळगाव पोलिसांकडून एका महिलेसह सात बांग्लादेशी नागरीकाना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सात जण बेळगाव शहरातील माळ मारुती पोलीस स्थानथानकाच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर रित्या रहात होते.अंजुम बेग 32, हाफीजूला इस्लाम 20,हकीब 20,अब्दुल निहार अली गाजी 60, अन्वर सद्दार 21,रोहन 21,मोहम्मद अल्विन शैफुद्दीन बेपरी 26 अशी यांचो नाव आहेत.
मोहंमुद बेपारी हा नकली पासपोर्ट बनवून दुबई ला पलायन करत होता त्यावेळी पुणे विमान तळावरून माळमारुती पोलिसांकडून याला अटक करण्यात आली आहे.बेपारी यांन पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असुन बेळगावात आणखी किती बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर रित्या राहताहेत याचा तपास पोलीस करत आहेत.गेल्या आठवड्यात भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी अमन नगर भागात हजारो बांग्लादेशी बेकायदेशीर रित्या असल्याचा आरोप केला होता त्याच्या काही दिवसात पोलिसांनी ही कारवाई केल्याने त्यांच्या आरोपाला बळ मिळालं आहे.माळ मारुती पोलिसाकडून सदर बांगलादेशी नागरीकाना शनिवारी 11 वाजता न्याया लयात हजर करण्यात येणार आहे त्यावेळीच सविस्तर माहिती मिळणार आहे