एकीकडे मालवण दुर्घटनेत मृतक पावलेल्या बेळगावातील मराठा मंडळ कॉलेज विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार किंवा शिक्षण संस्थेकडून मदत केली गेली नसताना कवी निळूभाऊ नार्वेकर यांनी आपल्या नवीन काव्य संग्रहाच्या विक्रीतून जमणारी सर्व रक्कम दोन पीडित कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी शनिवार दि 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वाङ्मय चर्चा मंडळात प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. यावेळी पुस्तक विक्रीतून जमा झालेली रक्कम मालवण घटना पीडित करुणा बर्डे आणि मुजममील अन्ननीगेरी यांच्या कुटुंबियांना देणार आहेत.
निळूभाऊंच्या मित्र परिवाराने पीडित कुटुंबियांना मदत देण्याचं ठरविल्या नंतर 10 हजार रुपये दिले आहेत. शब्दांचे कवडसे या पुस्तकाची किंमत 100 रुपये असून जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक खरेदी करावं जेणे करून जास्तीत जास्त रक्कम दोन गरीब कुटुंबियांना देण्यात येईल असं आवाहन निळूभाऊ यांनी केलं आहे.
निळूभाऊ नार्वेकर
मोबाईल नंबर- 9880270039