हलगा अलारवाड क्रॉस जवळील १९ एकर २० गुंठे जमीन सांडपाणी प्रकल्पा साठी संपादित करून प्रत्यक्षात काम सुरु करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या सह इतर अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं आणि काम बंद पाडलं आहे .
गुरुवारी सकाळी पालिकेचे वतीने संपादित केलेली जमीनीत प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे . यावेळी बेळगाव शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन करत संपादन रोखून काम बंद पाडलं . हलगा जवळील आलारवाड क्रॉस येथील १९ एकर २० गुंठे जमीन पालिकेने सांड पाणी प्रकल्पासाठी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे यास शेतकऱ्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयालात आवाहन दिल असून सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या जमीन संपादनास विरोध केला आहे . आमदार संजय पाटील यांनीच या आंदोलनात भाग घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम सुरु करा अशी भूमिका घेतली त्यामुळे गुरुवारी ;सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे