Wednesday, November 27, 2024

/

गोमटेशच शेड हटवा गुंजटकरांची डेडलाईन

 belgaum

Gomtesh shed  सार्वजनिक बाधकांम खात्याचे सथायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आपली पालिकेतील लढाई चालूच ठेवली आहे. गोमटेश समोरील आमदार संजय पाटील यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचं बेकायदेशीर असलेलं शेड हटवा अशी मागणी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे

गुरुवारी सर्किट हाऊस मध्ये उपमहापौर नागेश मंडोळकर सोबत त्यांनी जारकीहोळी यांची भेट घेऊन लेखी मागणी केली आहे.

गोमटेश समोरील रस्त्यात आलेलं शेड साठी अनेकदा मागणी झाली मात्र बेकायदेशीर शेड बद्दल कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळं एका आठवड्याच्या आत हटवा अन्यथा या भागातील जनतेसहआर पी डी क्रॉस जवळ तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील गुंजटकर यांनी दिला आहे. यावेळी पालकमंत्री जारकीहोळी यांनी त्वरित जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना याबाबत सूचना देऊ जर शेड हटवल गेलं नाही तर मी स्वतः धरणे आंदोलन मध्ये सामील होईन आंदोलन करीन अस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.