बेळगाव पोलीस उपायुक्त जी राधिका यांची केवळ ८ महिन्यातच बदली झाली असून बिदर जिल्हा पोलीस प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे . अनुपम अगरवाल यांच्या बदली नंतर राधिका यांनी गेल्या वर्षी ७ आक्टोंबर २०१६ रोजी आपला पदभार स्वीकारला होता. केवळ ८ महिन्यात बेळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात राधिका यांना बर्यापैकी यश आल होत एक महिला आय पी एस अधिकारी म्हणून त्यांनी खास महिलांच्या सुरक्षे साठी राणी चन्नमा विशेष महिला पथकाची स्थापना केली होती.
बिदर चे एस पी प्रकाह्स निकम यांच्या जागी जी राधिका यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला असून प्रकाश निकम यांची गुलबर्गा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदी नेमणूक करण्यात आली आहे . बेळगाव पोलीस उपायुक्त पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे याची माहिती मिळाली नाही आहे