बेळगाव पोलीस उपायुक्त जी राधिका यांची बदली रद्द करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.राधिका यांची बिदर जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून बदली करण्यात आली होती 25 मे रोजी राज्य शासनाने हा आदेश दिला होता तो केवळ दोन दिवसात बदलला असून त्यांची बदली रद्द करण्याचा नवीन आदेश सरकारने बजावला आहे. राधिका यांच्या प्रमाणे बिदर जिल्हा पोलीस प्रमुख प्रकाश निकम यांची देखील बदली रद्द करण्यात आली आहे.निकम यांची गुलबर्गा पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य पदी बदली करण्यात आली होती तो आदेश देखील रद्द करण्यात आला आहे
Trending Now