बेळगावातील ई एस आय आणि कामगारांच्या सर्व समस्या मार्गी लावू असं ठोस आश्वासन ई इ आय संस्थेचे मुख्य मेडिकल आयुक्त अशोक कुमार भाटिया यांनी दिली आहे . ते बेळगाव ई एस आय हॉस्पिटल ला आले असता चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्षांच्या संघटनेच्या वतीने भाटिया यांची भेट घेऊन बेळगावातील कामगारांच्या सर्व समस्यांची माहिती त्यांना अवगत करून देण्यात आली .
सर्व ई एस आय हॉस्पिटल मधून कॅश लेस व्यवहार होत असताना मात्र बेळगावातील ई एस आय आणि कामगारांशी संबंधित सर्व हॉस्पिटल मधून रोख पैसे घेऊन व्यवहार सुरु आहेत इथून पुढे असं आढळ्यास अश्या सर्व हॉस्पिटल ना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल असा इशारा देखील भाटिया यांनी दिला आहे . बेळगावातील ई एस आय हॉस्पिटल मध्ये मशीन यंत्र येऊन दोन वर्ष उलटली तरी अध्याप १८ डॉक्टरांची पॅड भरली गेली नाहीत आगामी १५ दिवसात १८ डॉक्तरांची नेमणूक करण्यात येईल कामगारांना डेंटल सुविधा देण्यासाठी लवकरच शहरातील खाजगी डेंटल हॉस्पिटल बरोबर करार करण्यात येईल असेही भाटिया म्हणाले . ग्रामीण भागातील कामगारासाठी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ई एस आय सुविधा उपलब्ध करून देणार आहोत असं देखील अशोक कुमार भाटिया यांनी स्पष्ट केलं आहे .
लवकरच बेळगावात ई एस आय आणि पी एफ कार्यालय
बेळगाव शहर के एक मोठे औध्योगिकी केंद्र असून जवळपास १लाख २५ हजार लोकांना प्रताय्क्ष आणि अप्रत्यक्ष रित्या रोजगार या शहरात दिला जातोय जवळपास ५२ हजार कामगार या शहरात असून ई एस आय आणि पी एफ कार्यालयासाठी हुबळी जावं लागतंय तर लवकरच बेळगावात पी एफ कार्यालय सुरु करू अशी माहिती मेडिकल आयुक्त अधिक कुमार भाटिया यांनी यावेळी दिली आहे . के एल ई सारख्या हॉस्पिटल बरोबर असलेला करार बिल थकीत असल्याने बंद असल्याने त्याला देखील चालना देऊ असं भाटिया यांनी म्हटलं आहे . ई एस आय संस्थेचे मेडिकल आयुक्त हे सर्वेसर्वा आहेत कामगाराशी संबंधित सर्व निर्णय हेंहच घेत असतात त्यामुळे माजी चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेने कामगारांच्या सर्व समस्या त्यांना अवगत करून देऊन एक महत्वपूर्ण काम केलं आहे या कामी सतीश तेंडुलकर यांचा मोलाचा वाट आहे . विकास कलघटगी बसवराज जवळी, शेवंतीलाल शाह देखील यावेळी उपस्थित होते