बेळगाव सह सीमाभागातील मराठी जनतेसाठी मराठी भाषेत २२ मे पर्यंत परिपत्रक द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी बसवराज इटनाळ यांना निवेदन देण्यात आले . भाषिक अल्पसंख्याक कायद्यांची अंमल बजावणी करा कायद्यानुसार मराठी भाषिकांना सर्व सरकारी परिपत्रिके मराठी भाषेत द्यावी , शिव जयंती मिरवणुकीत डॉल्बी साठी मराठी युवकावर घातलेले खोटे गुन्हे रद्द करा तसेच खानापूर तालुक्यावर अन्याय करणारा कस्तुरी रंगनं अहवाल रद्द करावा आशय मागण्याही यावेळी निवेदनाअद्वारे करण्यात आल्या आहेत . यावेळी मध्यवर्ती एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते
कन्नड नेत्याचा कंडू शमवण्याचा प्रयत्न
लोकशाही मार्गातून महाराष्ट्र एकीकरण समितीने सरकारी परिपत्रिक मराठी देण्याची मागणी केली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल असताना न्यायालयाचा आदेश न पाळणाऱ्या विरोधात एकीकरण समितीने आंदोलन छेडले आहे असं असताना एकीकरण समितीने निवेदन दिल्या नंतर काही कन्नड नेत्यांनी मराठी विरोधी गरळ ओकून आपला कंडू शमविण्याचा प्रयत्न केलाय. कन्नड नेत्यांनी कानडी वृत्त वाहिन्या तसेच सोशल मीडियावर मराठी आणि समिती विरोधी मत व्यक्त करत मराठी द्वेष दाखवून दिला आहे .