शिव जयंती मिरवणुकीत डॉल्बी वापरणाऱ्या शिव जयंती मंडळा विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
शहरातील पाच पोलीस स्थानकातील सहा शिव जयंती मंडळा वर गुन्हे नोंदवून एकूण 644 जणाविरुद्ध कारवाई केली आहे.
मिरवणुकीत डॉल्बी चा वापर करू नये म्हणून पोलिसांनी सख्त सूचना करून देखील मंडळांनी कर्ण कर्कश आवाज डॉल्बी लावली होती यामुळे आवाजाचा लोकांना त्रास झाला आहे मिरवणुकीत पोलिसांचा आदेश न पाळल्याचा ठपका देखील या मंडळावर ठेवण्यात आला आहे.
मार्केट पोलीस स्थानकातील 1, मालमारुती एक, ए पी एम सी एक, खडे बाजार 2 आणि ग्रामीण पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील एका मंडळावर कारवाई करण्यात आली आहे.
आपण जेव्हा शिवरायांचा इतिहास दाखवण्यासाठी चित्ररथ मिरवणुक काढतो तेंव्हा आपण हाय डिसेबल डॉल्बीचा आग्रह धरणे योग्य नव्हे दुसऱ्या कार्यक्रमांना डॉल्बी वापरण्यास मुभा दिली जाते मग आम्हालाच विरोध का?असे म्हणने देखील चुकीचे आहेत.आपली संस्कृती म्हणजे डॉल्बी च्या धाड धिंगाण्यावर अश्लील गाणी लावून थिरकने नव्हे याचा विचार युवकांनी करावा अशी मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी मदन बामणे यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे