पिण्याचं पाणी हे महाराष्ट्र सरकार कडून कर्नाटक सरकार ला दिल जातंय..त्यामुळं आम्हाला पाणी देणारे किरण ठाकूर कोण…? दोन राज्यातील सरकारांचा बांधव्याचा नात्याचा हा विषय आहे किरण ठाकूर हे केवळ बेळगाव चे नागरिक आहेत आणि कर्नाटकाचा एक भाग आहेत.ठाकुर यांच्यासह कर्नाटकच्या जनतेला पिण्याचं पाणी महाराष्ट्रा कडून मिळवुन देण्याची जबाबदारी कर्नाटक सरकार पार पडत अशी भूमिका जिल्हाधिकारी एन जयराम यांनी पत्रकारा समोर मांडली आहे. कन्नड पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
भाषिक अल्प संख्यांक कायध्यानुसार मराठी भाषिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळावेत यासाठी ठाकूर यांनी मराठी भाषिकांची अनेक वर्षे जुनी मागणी पूर्ण करण्याची मागणी करत महाराष्ट्र शासन कर्नाटकाला पाणी देत आहे सहकार्य करत आहे तेंव्हा लोकशाही च्या मार्गातून असलेली तुम्ही मराठी जणांची मागणी पूर्ण का करत नाही असा बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता.ठाकूर यांनी काल समिती नेत्यांसह महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील यांची कल्पना दिली होती.
मराठी वृत्तपत्र शासकीय जाहीरातीत बेळगाव शहराचा उल्लेख बेलगाम असा करतात यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला असता अश्या सर्व मराठी वृत्तपत्रांची सरकार कडून दिलेल्या जाहिरातीत एडिट करून बेळगावी च बेलगाम केलेल्या वर्तमान पत्रांना जाहिरात बिल देणार नाही त्यांची बिल थांबवा सर्व संबंधित अधिकाऱ्याना आदेश देणार आहोत असं ते म्हणाले.
मराठी भाषिक सोबत मराठी वृत्त पत्रांची देखील गळचेपी केली जात आहे का अशी चर्चा सुरू आहे