Thursday, January 2, 2025

/

बेळगाव गोवा नवीन ए सी बस सेवा सुरू

 belgaum

Bus service goa
बेळगाव हुन गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आणखी एक सुविधा उपलब्ध झाली असून गोव्यातील पेरिस्टा ट्रान्सलाईन या बस कंपनी ने व्हाया चोरला पणजी आणि वास्को साठी नवीन बस सेवा सुरू केली आहे.

या नवीन बस सेवेसाठी पेरिस्टा ट्रान्सलाईन भारत बेंझ कंपनीच्या 2प्लस 2 ए सी लक्झरी टुरिस्ट बस खरेदी केल्या आहेत.यासाठी 250 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. बेळगाव पासून सकाळी 7 आणि सायंकाळी 5 तर वास्को मधून देखील सकाळी 7 आणि सायंकाळी 5 अशी वेळ असणार आहे.

न्यू के एस आर टी सी आणि कदंब बस सेवेवर निर्भर असलेल्या प्रवाश्यांना या नवीन ए सी बस एक ऑप्शन मिळाला आहे. या अगोदर कदंब ने ए सी बस काही दिवसासाठी सुरू केली होती मात्र ती बंद झाली आहे.
पेरिस्टा ट्रान्सलाईन ची बस सेवा जर कायम स्वरूपी सुरू झाली तर गोव्याहून बेळगाव ला खरेदी ला येणाऱ्या आणि मेडिकल ट्रीटमेंट साठो येणाऱ्या प्रवाश्यांना एका दिवसात ये जा करणे सुलभ होणार आहे. चोरला घाटाच्या नैसर्गिक सानिध्यात ए सी बस चा प्रवास आनंद दायी ठरेल.

बुकिंग कार्यालय बेळगाव
मनीष ट्रावेल्स श्री सागर कॉम्प्लेक्स रामदेव हॉटेल जवळ
फोन: 0831 4206066

गोवा: आत्माराम टूर ट्रावेल्स
अपना बाजार वास्को
फोन:09890219773
http:/peristatransline.in

 belgaum

1 COMMENT

  1. महाराष्ट्राच्या गाड्यावर जय महाराष्ट्र लिहून काय साध्य होणार आहे????
    महाराष्ट्रात येणा-या कानड्यांच्या गाडीवर
    “जय महाराष्ट्र ” लिहणं सक्तीच करा व आपली ताकत दाखवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.