Friday, December 27, 2024

/

हे तर सेटिंग बहाद्दर नगरसेवकांचे अपयश

 belgaum

स्मार्ट सिटी म्हणून फक्तच चर्चेत स्मार्ट असलेले बेळगाव खऱ्या अर्थाने स्मार्ट तर नाहीच स्वच्छही नाही हेच उघड झाले आहे. स्वछ भारत मिशनच्या सर्वेक्षणात ४३४ शहरांच्या स्पर्धेत बेळगावला २१८ वा क्रमांक मिळवला आहे, हे बाकी कुणाचे नव्हे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कडून पैसे खाणाऱ्या सेटिंग बहाद्दूर नगरसेवकांचे अपयश आहे.
नगरसेवक झाल्यावर राजपत्रित नोंद होण्यापूर्वी सर्वप्रथम अंगावर पांढरे कपडे घालण्यासाठी मदत करतो तो माणूस असतो स्वच्छता विभागाचा. या माणसापासून सुरुवात करून पुढे पैसे खाण्याचे शिक्षण सुरू होते आणि नगरसेवक घडत जातो, काही अपवाद सोडले तर जनतेचे आरोग्य सांभाळण्याच्या या पैशात सारेच वाटेकरी आहेत, फक्त आजच्याच नव्हे तर मागच्यांनीही हेच केले आहे, यामुळे नम्म बेळगाव सुंदर बेळगाव फक्त कागदावर राहिले आहे.

एक माजी नगरसेवक सांगतात, जर मनपाने स्वच्छतेसाठी असलेला सगळा पैसे पूर्ण प्रामाणिकपणे खर्च केला तर शहरात एकही डास राहणार नाही, ठेकेदाराला इतके कमिशन द्यावे लागते की शेवटी फक्तच सारवासारव करून तो मोकळा होतो. पैसे पोचले नाहीत तर अधिकारी सह्या करत नाहीत आणि नगरसेवक स्टँट करतात, रोज सकाळी फोनाफोनी वाढते, यासाठी पैसे फेकावेच लागतात.
याच परिस्थितीने शहराची वाट लागली आहे, ती सुधारेल असे वाटत नाही, आणि सुधारली तर त्या दिवशी नगरसेवकांनी पैसे खायचे बंद झालेले असेल. आम्ही काय नगरसेवकांच्या विरोधात नाही, तेही म्हणतील पैसे काय आम्हीच खातो काय म्हणून, ते ही खरं आहे, यामुळे हा विषय चर्चा करूनच संपण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.