रेल्वेखाली झोकून एका महाविद्यालयीन विध्यार्थीनी ने आत्महत्त्या केल्याची घटना तिसऱ्या रेल्वे गेट पराठा कॉर्नर समोर घडली आहे.
घटनास्थळी रेल्वे पोलीस दाखल झाले आहेत.बेळगाव live ला मिळालेल्या माहिती नुसार सदर युवतीच्या कॉलेज बॅग मध्ये ओळखपत्र सापडलं असून ती गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स च्या बी कॉम 2 मध्ये शिकत आहे.निशा एस पाटील वय 20 वर्ष अस आत्महत्त्या केलेल्या युवतीच नाव आहे. लक्ष्मी नगर मच्छे येथील रहिवाशी असून सकाळी आपल्या वडिलांनी तिला परीक्षा देण्यासाठी बेळगाव ला सोडलं होत. मृतक मुलीचे वडील सैन्यदलात सेवेला असून ते सुट्टीवर आले होते अशी ही माहिती बेळगाव live ला मिळाली आहे मात्र आत्महत्त्येचं नेमकं काय कारण आहे याचा तपास पोलीस करताहेत. गेल्या चार महिन्यात पहिले रेल्वे फाटक ते चौथ्या गेट पर्यंत आत्महत्त्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे या भागात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे