एकण दहा ग्रुपमध्ये स्पर्धा।पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी।वूमन,बारा आणि पंधरा वर्षाखालील गटात भारतात प्रथमच स्पर्धा घेण्यात अली।अनेक अडथळे पार करून मोटररसायकल रेसर्सनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले
जैतानमळ येथे खास ट्रॅक रेससाठी तयार करण्यात आला होता .
या मोटो क्रॉस स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे भारतात प्रथमच बारा वर्षाखालील,पंधरा वर्षाखालील मुलांसाठी आणि महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.महिलांच्या गटात साताऱ्याची तनिका संकेत शानभाग या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने विजेतेपद मिळवले.आठ वर्षाचा मुंबईचा रहिष खत्री याने बारा वर्षाखालील गटात विजेतेपद मिळवून उपस्थितांची दाद मिळवली.राहिष खत्री हा जगातील सर्वात लहान बाईक रायडर आहे.त्याने सहा वर्षाचा असताना जागतिक विक्रम नोंदवला होता. युवराज खोले देशमुख या पुण्यातील सातवीत शिकणाऱ्या रायडरने पंधरा वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले.स्पर्धा दहा गटात घेण्यात आली. स्पर्धेसाठी आयोजकांनी बरेच परिश्रम घेतले.स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
Trending Now