जादू टोणा करणी करण्यासाठी घरात आणून ठेवलेल्या तीन घुबड जप्त करण्यात आली आहे.बेळगाव जिल्हा वन मोबाईल खात्याच्या विशेष पथकाने बैलहोगल येथील येन्नूर गावात धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. फॉरेस्ट मोबाईल स्कॉड पी एस आय आय के एस कोचेरी यांच्या नेतृत्वात सदर कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रप्पा मिर्जी यांच्या घरात धाड टाकून हे तीन घुबड जप्त केले असून गोव्यात जादू टोणा मन्त्र करणी करण्यासाठी विक्री करत असल्याची माहिती मिळाली आहे. घुबडांची लहान पिल्लं पाळत होते मग त्यांची विक्री करत होते.