शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी नाकारल्या नंतर आता बेळगाव पोलिसांनी शिवसेनेला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यास देखील बेळगाव पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
दोन मंत्र्यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी केल्याच्या निषेधार्थ बेळगाव शिवसेना संभाजी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करणार होती यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी मागितली होती मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढं करत परवानगी नाकारली आहे. कर्नाटक पोलिसांनी समिती बरोबर शिवसेनेची गळचेपी केली आहे.