हेरगिरीच्या आरोपावरून नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज स्थगिती दिली.
हॉलंड मधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज ही स्थगिती दिली आहे या निर्णयात जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. साळवें सोबत शशी थरूर यांनी देखील जाधव यांची बाजू मांडली आहे
जाधव यांची बाजू जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांनी हेग आंतर राष्ट्रीय न्यायालयात मांडली त्यामुळे कुलभूषण जाधव यांची संभाव्य फाशी टळली आहे.
बेळगाव सीमा प्रश्नी देखील आंतर राष्ट्रीय वकील हरीश साळवे हे बाजू मांडत आहेत कुलभूषण जाधव यांच्या निकाल मुळे बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद साळवे करतील आणि सुप्रीम कोर्टात मराठी माणसाला न्याय मिळेल असा विश्वास सीमा भागातील मराठी जनतेला वाटत आहे . या अगोदर साळवे यांनी वोडाफोन कंपनी ला २०११ मध्ये ११ हजार कोटी दंड आयकर विभाग केंद्र सरकार कडून वसूल करून दिला होता या शिवाय अभिनेता सलमान खान ला देखील निर्दोष करण्यात साळवे यांची मोलाची भूमिका होती आता जाधव यांची फाशी रोखून साळवे यांनी पुन्हा एकदा आपलं कायद्यांतल वर्चस्व सिद्ध केलं आहे