बेळगाव रेल्वे स्टेशन ते तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतचा रेल्वे ट्रॅक रविवार साठी सुसाईड डे ठरला आहे कारण केवळ पाच तासाच्या अवधीत आणि सकाळी झालेल्या घटनेच्या अर्धा की मी अंतरावर दुसरी आत्महत्त्या घडली आहे.
सकाळी 11 वाजता च्या सुमारास दुसऱ्या आणि तिसऱ्या गेट च्या मध्ये निशा पाटील नामक कॉलेज विध्यार्थीनी ने रेल्वेत खाली उडी टाकून आत्महत्या केली होती ती घटना झाल्यानंतर साडेचार च्या सुमारास पहिल्या रेल्वे फाटका जवळ एका 40 वर्षीय इसमाने आत्महत्या करून घेतली आहे. अध्याप या व्यक्तीची ओळख पटली नसून नाव समजलं नाही आहे.एकूणच रेल्वे स्टेशन ते चौथ्या गेट पर्यत आत्महत्या च्या घटनात वाढ झाली रेल्वे ट्रॅक म्हणजे सुसाईड पॉईंट होत चालला आहे.