शहरातील शिव जयंतीचं वैभव लहानात लहान आणि मोठ्यात मोठया मंडळा च्या योगदाना मुळे वाढतंच गेलं आहे आणि आजच्या घडीला ते देशात सर्वात उत्साहाने शिव जयंती साजरे करणारे शहर म्हणून नाव लौकिक झाला आहे. असंच एक शहरातलं केवळ ४० युवकांच मंडळ आहे भोई गल्लीतील शीव जयंती मंडळ, मंडळ जरी लहान असलं तरी सामाजिक संदेश देणारे चित्र रथ बनवून या मंडळाने सगळ्या समोर आदर्श ठेवला आहे.
या मंडळाचे अध्यक्ष नवरत्न कामाने यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले की गेल्या १६ वर्षे पासून चित्ररथ काढण्यात येतो त्यात सहा वेळा लोकमान्य संस्थेचं पारितोषिक जिंकल आहे . वेळेत लग्न न लावल्यामुळे होणारी हानी आणि लग्न मुहूर्तावर लागावे साठी जन जागृती करणारा मागील वर्षीचा आकर्षक चित्ररथ सगळ्या समोर आदर्श ठेवणारा होता.
यावर्षी देखील ४० कलाकारसह सोन्याचा नांगर फिरवून शिवबांनी कश्या शेतकऱ्यांच्या समस्या त्याकाळात दूर केल्या होत्या तश्या आजचा सरकार का करत नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखत नाही या बद्दल जन जागृती करणारा देखावा सादर करणार आहोत अशीही नवरत्न यांनी माहिती दिली आहे