अर्पिता नाईक अपहरण केस मध्ये क्लोरोफार्म आणि झोपेच्या गोळ्या पुरवलेल्या दोन केमिष्ट ना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
दिव्या मलघाण या अर्पिताच्या जिवलग मैत्रिणीने आपला प्रियकर केदार सोबत जेवणाला बोलावुन क्लोरोफार्म आणि झोपेच्या गोळ्या देऊन अपहरण केलं होतं. क्लोरोफार्म दिल्या प्रकरणी हुबळी येथील मेडिकल शॉप च्या चंद्रशेखर आणि केमिकल पुरविलेल्या केमिष्ट सतीश यांना अटक करून बेळगाव ला आणलं आहे. अपहरण यशस्वी करण्यासाठी काळी जादू केलेल्या मांत्रिकाचा देखील शोध पोलीस घेताहेत. 5 कोटी पैकी 70 लाख रुपये तिरुपती चया देवाला कमिशन अर्पण करणार होते अशी देखील माहिती समोर येत आहे