बेळगावातील शिवजयंती मिरवणुकीत २००५ पर्यंत फक्त सीमा प्रश्नावरील फलक आणि शिवाजी महाराज असच स्वरूप होतं, कालांतराने पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीने सीमा प्रश्नावरील देखाव्यात कमतरता आली आणि मग इतिहासावर आधारित सजीव देखाव्याची संख्या वाढली अश्या पैकी गेल्या ८० वर्षापासून चालत असलेले महाद्वार रोड येथील संभाजी गल्लीतील शिव जयंती मंडळ हे गेल्या ३३ वर्षा पासून चित्र रथ मिरवणुकीत सहभाग घेत आलंय .
डॉल्बीला जाहीर रित्या विरोध करत २०१३ साली चित्ररथ मिरवणुकीत पाहिलं ढोल पथक तयार केलेलं मंडळ म्हणून संभाजी गल्ली मंडळाकडे पाहिले जाते ,छावा नावाचं ढोल पथक तयार केलं आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण चौगुले यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे .
स्वराज्याची न्याय व्यवस्था आणि आज ३५० वर्षा नंतर आजची न्याय व्यवस्था यावर आधारित सजीव देखावा या मंडळाने यावर्षी सादर करण्याचा निर्णय घेतला असून केवळ १४ व्या वर्षी बलात्कार प्रकरणी रांजाच्या पाटलाला शिक्षा देण्याचा निर्णय राजांनी केवळ दीड दिवसात घेतला होता मात्र आज पाच पाच वर्ष होऊन देखील कोपर्डी सारखे बलात्कारी मोकाट फिरत आहेत हे सर्व हालत्या देखाव्यावर आणि शाहिराच्या तोंडून सादर केलं आहे यासाठी ३० पात्रे बनविण्यात आली असून गल्लीतील तीन मुलिंच संभाषण हे मुख्य आकर्षण असेल अशी माहिती देखील चौगुले यांनी दिली आहे .