पर्यटनामूळ उद्योग आणि आर्थिक स्थैर्य वाढते आणि जनतेच्या मनोरंजनासाठी सेवा दिल्याचं समाधान होतंय याशिवाय एकेकाळी देशात पर्यटनात 13 व्या स्थानावर असलेलं कर्नाटकाने आज तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे अस वक्तव्य पर्यटन मंत्री आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केलंय.
बेळगाव तालुक्यातील कुट्टलवाडी गावात पहिल्या खाजगी वाटर पार्क आणि फन फेअरच उदघाटन केल्या नंतर ते बोलत होते. यशनिश या
युवकांनी लोकांच्या मनोरंजना बरोबर स्वावलंबी पणाने उद्योगाची स्थापना करत स्थानिक लोकांना देखील रोजगार देण्याचा कौतुकास्पद कार्य केले आहे. राज्य सरकार कडून पर्यटनाच्या अनेक सुविधा जनतेसाठी असून युवकांनी यात पुढं आलं पाहिजे असं देखील देशपांडे म्हणाले.
शहरात एक सुन्दर अश्या वाटर पार्कची निर्मिती करण्यात आली असून युरोप सिडनी आणि बंगळुरू मध्ये असलेल्या वाटर पार्क ची मजा आता बेळगावात घेता येणार आहे डेवलोपमेंट ओटीएनटेड मिनिस्टर असा उल्लेख खासदार सुरेश अंगडी यांनी केला आहे.
यावेळी काँग्रेस कामगार नेते लक्ष्मण समसुद्दी उपस्थित होते.
7 मे पासून जनतेला वाटर पार्क खुले
यशनिश वाटर पार्क चे संचालक महेश अरकसाली यांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीत सांगितलय की टेक्निकल कारणामुळे यशनिश वाटर पार्क 29 एप्रिल ऐवजी 7 मे पासून जनतेसाठी उपलब्ध असणार आहे. सुरुवातीचं 25 टक्के डिस्कोऊंट ही ऑफर 31 मे पर्यंत असणार आहे.