एक वर्ष झालं तरी स्मार्ट सिटी काम सुरू झालेल नाही 400 कोटी अनुदानास 25 कोटी व्याज जमा झाल असून अजूनही काम सुरू झालेली नाहीत यास पालकमंत्री रमेश जारकीहोळी जबाबदार आहेत.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष पणा ही याला जबाबदार आहे असा आरोप खासदार सुरेश अंगडी यांनी केला आहे.
गुरुवारी काडा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने स्मार्ट सिटी काम सुरू व्हायला विलंब झाला आहे त्यामुळं केंद्र सरकार च्या अधिकाऱ्यांना काम सुरू करा अश्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती अंगडी यांनी पत्रकारांना दिली आहे.
बुधवारी बंगळुरू मध्ये झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटी अधिकारी राकेश सिंह यांच्या बरोबर चर्चा केली आहे ते बेळगावातील अधिकाऱ्यांना सूचना देणार आहेत पालक मंत्री रमेश जारकीहोळी अधिकार्या सोबत लवकरच याबद्दल बैठक होणार आहे असंही अंगडी म्हणाले.
कॅशलेस ट्रानजकॅशन साठी छोटे व्यापारी रेल्वे बस स्थानकावर व्हावं यासाठी विद्यार्थ्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
पोलिसांची अंधाधुंदी कारभार
पोलिसांनी बेळगाव शहरात अंधाधुंद कारभार चालविला असून माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यावर अन्याय केला आहे. शिवापूर गरीब शेतकरी सुंठकर यांना दिलेली वागणूक योग्य नसून अश्या घटनांचा मी भाजप खासदार म्हणून सहन करणार नाही असं अंगडी म्हणाले.