बेळगाव उत्तर चे काँग्रेस आमदार फिरोज सेठ यांना नोटीस बजावण्यात आली आहे सेठ यांच्यासह 8 आमदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.
4 विधान सभा आणि 4 विधान परिषदेच्या आमदारांना 2015 -16 चे आपल्या संपत्ती आणि मालमत्तेची सविस्तर माहिती न दिल्या प्रकरणी सेठ यांच्यासह 8 जणांना लोकायुक्त यांनी अंतिम नोटीस बजावली आहे.
मागील वर्षाची सर्व माहिती देण्याची मुदत संपली असताना अजूनही 8 आमदारांनी संपत्ती माहिती दिली नाही आहे.काही आमदारांनी लोकायुक्तना पत्र लिहुन गेल्या वर्षी लोकायुक्तांना दरवर्षी संपत्ती माहिती देणे बंधनकारक नव्हतं प्रतिज्ञा पत्रात म्हटलं होतं. नोटीस मिळाल्याच्या दहा दिवसाच्या आत नोटिशीस उत्तर ध्या अस नोटीस मध्ये नमूद करण्यात आलंय.