बेळगाव पोलिसांनी शनिवारी एक दिवस मीटर सक्ती मोहीम राबवत तब्बल 222 ऑटो रिक्षा दंड लावत 16 ऑटो रिक्षे जप्त केले आहेत जिल्हाधिकारी एन जयराम यांनी दिलेल्या डेड लाईन नन्तर पोलिसांनी ऑटो रिक्षा कारवाई सुरू केली आहे.
शहरातील ऑटो चालकांच्या समर्थनार्थ खासदारअंगडी पुढे सरसावले आहेत. पोलिसांनी ऑटो चालकांना त्रास देणं बंद कराव त्याआधी जिल्हा प्रशासनाने शहरातील रस्ते सुधा रावेत असा सल्ला दिला आहे. पोलिसांनी रिक्षा चालका कडून जो दंड वसुली सुरू केली आहे ती योग्य नसुन मीटर सक्ती करण्या अगोदर जिल्हा प्रशासनाने रस्त्यांचा दर्जा सुधारावा.रस्त्यांच्या दुरावस्थे मुळे खड्डे जास्त असल्यामुळं मीटर दुरुस्ती साठी पैसे खर्च होत आहेत हे ऑटो चालकांच मानसिक खच्चीकरण थांबवावं अस अंगडी यांनी म्हटलं आहे
अंगडींच्या वक्तव्याचा सोशल मीडिया वर जोरदार समाचार घेतला जात आहे.एक जबाबदार लोकप्रतिनिधी कडून अश्या प्रकारचं वक्तव्य योग्य आहे का?असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. स्वतः कायदा बनवणाऱ्या कडून अशी भाषा योग्य नसून ऑटो चालकांच्या कडून प्रवाश्याना होणाऱ्याआर्थिक पिळवणुकी वेळी अंगडी यांनी येऊन थांबायला हवं अशी देखील विचारणा होत आहे. फक्त ऑटो चालकांच रक्षण का इतर जनतेचा का विचार केला जात नाही अश्या देखील प्रतिक्रिया उमटत आहेत
सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी कडून ऑटो चालकांची बाजू घेतली जाते हे आपण अनेकदा पाहिलंय त्या पक्षांची वोट बँक ऑटो चालक आहेत हे समजण्या सारख आहे.पण सामान्य माणूस म्हणून जनतेला पण काही अधिकार आहेत मग एकच सेक्शन खास ट्रीटमेंट का ?
खासदार अंगडी हे गेली 13 वर्ष 2004 पासून खासदारकीच पद भोगत आहेत गेली 13 वर्ष त्यांनी हे पद रोखुन धरलय का त्याना गेल्या 13 वर्षात बेळगाव शहरात चांगले रोड बनवता आले नाहीत चांगले रस्ते राहिले असते तर गरीब ऑटो चालकांचे मीटर दुरूस्ती साठी पैसे वाचले असते .त्यामुळं शहरातील नागरिकांसाठी कोण योग्य आणि कोण अयोग्य ही शिकण्याची वेळ आली आहे