बेळगावात माणुसकीला काहीच कमी नाही,मिरापूर गल्ली शहापूर येथील कुरणकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट ने आग लागून पूर्ण खाक झाल्याने या घरातील चारी कुटुंबे रस्त्यावर आली होती त्यांना गरज होती ती मदतीची …
त्यांच्या मदतीसाठी अथक प्रयत्न झाले आहेत.
गल्लीतील पंच आणि नगरसेवक विजय भोसले सर्वप्रथम पुढे सरसावले आणि पीडित कुटुंबाला सावरून आश्रय दिला. शनिवारी लागलेल्या आगीत कुरणकर यांच्या घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे कपडे लत्ये कागदपत्रे भांडी अन्न धान्य सगळंच जळल्याने ही चारही कुटुंबे उघड्यावर होती अग्नी शामक दलाच्या गाड्यांनी आग विझवली मात्र या परिवारातील सदस्यांच काय?त्यांचं जेवण कुठं राहणार कुठं ? याची काळजी मिरापूर गल्लीतील पंच आणि पुढारी युवक कार्यकर्त्यांना लोकांना होती . नगरसेवक विजय भोसले यांनी चंद्रकांत कुरणकर यांच्या चार कुटुंबियांना तात्पुरता मारवाडी चाळीत राहण्याची सोय करून दिली या नंतर अनेकांचे मदतीचे हात त्यांना मिळाले.
मिरापूर गल्ली पंच कमिटी आणि सार्वजनिक गणेश मंडळा ने प्रत्येकी 10 हजार, विजय भोसले एस एम जडे 5 हजार, कल्लाप्पा शहापुरकर, विश्वनाथ सानिकोप, विनायक कारेकर, 2 हजार रुपये, पंच महादेव यादव 25 किलो तांदूळ, 2 किलो तेल, अशी मदत दिली आहे.
आमदार महापौरांकडून पाहणी
पीडित कुटुंबियांना आमदार संभाजी पाटील, महापौर संज्योत बांदेकर,माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्यासह मराठी नगरसेवकांनी भेटून सांत्वन केले, आज सायंकाळी होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीत प्रत्येक नगरसेवकांशी चर्चा करून मदत करू असं आश्वासन महापौर संज्योत बांदेकर तर वयक्तिक आणि शासकीय मदत देखील करू असे आमदार संभाजी पाटील यांनी आश्वासन दिलंय. भाजप नेते किरण जाधव यांनी देखील पीडित कुटुंबाचं सांत्वन करून मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं.