महाराष्ट्र एकीकरण समितीने एक व्यक्ती एक पद आत्मसात करावं या बेळगाव live च्या भूमिकेला बेळगावसह सीमा भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.भले ही एक व्यक्ती एक पद ही संकल्पना नेत्यांना पटत नसेल मात्र युवा वर्गांने या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
येळळूर हे सीमा लढ्याच केंद्र बिंदू असलेलं गाव आहे जे येळळूर मध्ये पेरलं जातंय ते संपूर्ण सीमा भागात उगवतय हा इतिहास आहे हे अनेकदा सिद्ध देखील झालं आहे.एक व्यक्ती एक पद या बेळगाव live च्या भूमिकेस येळळूर ग्राम पंचायती मधून प्रथम प्रतिसाद मिळाला आहे.जुन्या जाणत्या नेत्यांनी मध्यवर्तीत काम करावं आणि जेष्ठा सोबत घटक समित्यांत युवकांचा भरणा अधिक करा अशी मागणी येळळूर ग्राम पंचायत सदस्य राजू पावले यांनी केली आहे.
सीमा लढ्यात सोशल मीडिया वरील जनजागृती मूळ युवकांचा सहभाग वाढला आहे सध्या स्थितीत राष्ट्रीय पक्षांनी अनेक प्रलोभन युवकांना दिलीत यामुळं राष्ट्रीय पक्षाकडे युवक आकर्षिले जाऊ नयेत यासाठी युवकाना समिती पासून दूर जाऊ नयेत म्हणून घटक समित्या मध्ये युवकांना समील करून घ्यावे अशी मागणी पावले यांनी केली आहे.लवकरच मध्यवर्ती अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पत्र देऊन मी मागणी करणार अस देखील पावले यांनी बेळगाव live ला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे